रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली Manoranjan Mishra यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती; 1 नोव्हेंबर 2023 पासून सांभाळणार पदभार

कार्यकारी संचालक म्हणून मनोरंजन मिश्रा हे अंमलबजावणी विभाग, जोखीम देखरेख विभाग, बाह्य गुंतवणूक आणि संचालन विभाग पाहतील.

RBI (Photo Credits: PTI)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 01 नोव्हेंबर 2023 पासून मनोरंजन मिश्रा यांची कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून नियुक्ती केली आहे. कार्यकारी संचालक म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी मिश्रा हे नियमन विभागात मुख्य महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मिश्रा यांना रिझर्व्ह बँकेत तीन दशकांहून अधिक काळ बँका आणि एनबीएफसीचे नियमन, बँकांचे पर्यवेक्षण आणि चलन व्यवस्थापन या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. नियामक/पर्यवेक्षी धोरणे तयार करण्यात योगदान देणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यकारी गटांमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.

आता कार्यकारी संचालक म्हणून मनोरंजन मिश्रा हे अंमलबजावणी विभाग, जोखीम देखरेख विभाग, बाह्य गुंतवणूक आणि संचालन विभाग पाहतील. मिश्रा हे अर्थशास्त्र आणि एमबीए (बँकिंग आणि वित्त) मध्ये पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांनी यूकेच्या अ‍ॅस्टन बिझनेस स्कूलमधून फायनान्स आणि फायनान्शियल रेग्युलेशनमध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. (हेही वाचा: Rs 2000 Notes: आतापर्यंत 2,000 रुपयांच्या 97 टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्या, 10,000 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे- RBI)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)