Relief for Sadhguru's Isha Foundation: सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती

हायकोर्टाने पोलिसांना दिलेल्या सूचनांना आम्ही स्थगिती दिल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हे धार्मिक स्वातंत्र्याचे मुद्दे असून ही अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर बाब असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Supreme Court

Relief for Sadhguru's Isha Foundation: सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनच्या चौकशीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुकुल रोहतगी हे सद्गुरूंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने कोईम्बतूर येथील आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा योग केंद्राची झडती घेतली होती. आता पोलिसांच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने रोक लावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 ऑक्टोबरला होणार आहे. ईशा फाऊंडेशन प्रकरणातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला नोंदवलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील देण्याचे निर्देश दिले आहेत.

हायकोर्टाने पोलिसांना दिलेल्या सूचनांना आम्ही स्थगिती दिल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हे धार्मिक स्वातंत्र्याचे मुद्दे असून ही अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर बाब असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सद्गुरु यांचे लाखो फॉलोअर्स आहे, त्यामुळे केवळ  तोंडी दाव्यांवर त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालय असा तपास सुरू करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयातून स्वत:कडे वर्ग केले आहे. (हेही वाचा: 'सद्गुरु यांची स्वतःची मुलगी विवाहित, मग ते इतर महिलांना संन्यासीसारखे जगण्यासाठी का प्रोत्साहन देत आहेत?'- Madras High Court चा प्रश्न)

सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now