Ravish Kumar Resigns From NDTV: एनडीटीव्हीचे वरिष्ठ संपादक रवीश कुमार यांनी दिला राजीनामा
कुमार हे देशातील लोकांवर परिणाम करणाऱ्या अनेक मुद्द्यांच्या ग्राउंडब्रेक कव्हरेजसाठी ओळखले जातात.
एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. कुमार हे चॅनलवरील हम लोग, रविश की रिपोर्ट, देस की बात आणि प्राइम टाइमसह अनेक कार्यक्रम होस्ट करत होते. कुमार हे देशातील लोकांवर परिणाम करणाऱ्या अनेक मुद्द्यांच्या ग्राउंडब्रेक कव्हरेजसाठी ओळखले जातात. त्यांना दोनदा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड आणि 2019 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कुमार यांच्या राजीनाम्याची घोषणा करताना, चॅनलने अंतर्गत मेलमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या राजीनामा स्वीकारला आहे. याआधी एनडीटीव्हीचे मालक आणि संस्थापक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदाचा मंगळवारी, 29 नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)