BJP MP Dies: भाजपा नेता, माजी केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन

रतनलाल कटारिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते.

Rattan Lal Kataria | Twitter

भाजपा नेता रतनलाल कटारिया यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि अंबाला येथील खासदार रतनलाल कटारिया यांचे गुरुवारी (18  मे)  पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. रतनलाल कटारिया हे गेल्या अनेक दिवसांपासून चंदिगडच्या पीजीआयमध्ये दाखल होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रतनलाल कटारिया यांच्या निधनानंतर हरियाणात शोककळा पसरली आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now