Ram Temple 'Pran Pratishtha' Ceremony: उत्तर प्रदेशमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटन दिवशी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद, दारूविक्रीही बंद; CM Yogi Adityanath यांची घोषणा
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे सर्वांना श्री राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याची आणि हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्याची संधी मिळणार आहे.
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य अभिषेक सोहळ्याबाबत उत्तर प्रदेशात उत्साहाचे वातावरण आहे. हा ऐतिहासिक सोहळा साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 22 जानेवारीला संपूर्ण राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. याशिवाय या दिवशी राज्यातील सर्व दारुची दुकाने बंद राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे सर्वांना श्री राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याची आणि हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्याची संधी मिळणार आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिराचा अभिषेक पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी सात हजार विशेष अतिथी आणि चार हजार संतांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच या ऐतिहासिक सोहळ्याला जगभरातील 50 देश आणि सर्व राज्यांतील सुमारे 20 हजार लोक उपस्थित राहणार आहेत. देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होणारा हा देशातील मोठा सण असेल, असे मानले जात आहे. (हेही वाचा: Ghaziabad Likely To Renamed: गाझियाबाद शहराचे नाव बदलून गजनगर किंवा हरनंदी नगर होण्याची शक्यता)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)