Bhool Chuk Maaf Teaser: राजकुमार रावचा 'भूल चुक माफ'चा मजेदार टीझर रिलीज; 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Watch Video)

राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या 'भूल चुक माफ' नवीन चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल.

Photo Credit- X

Bhool Chuk Maaf Teaser: राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या 'भूल चुक माफ' (Bhool Chuk Maaf) या नवीन चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल. करण शर्मा दिग्दर्शित 'भूल चुक माफ' चित्रपट प्रेम, नशीब आणि विश्वासघाताची कहाणी सांगते. चित्रपटात राजकुमार राव (Rajkummar Rao) रंजन नावाची भूमिका साकारली आहे. जो सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्याची प्रेयसी तितलीसोबत लग्न करू इच्छितो. पण लग्नाआधी अशा काही घटना घडतात ज्यामुळे रंजनचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. टीझरमध्ये चित्रपटाची कथा अतिशय रंजक पद्धतीने दाखवण्यात आली आहे.

मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. दिनेश विजन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

'भूल चुक माफ' चा टीझर पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now