Rahul Gandhi On Union Budget 2024: मोदी सरकारचा अर्थसंकल्प 'खूर्ची बचाव'; राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
'इतर राज्यांच्या जीवावर मित्रपक्षातील राज्यांना पोकळ आश्वासनं, मित्रांना खूष करताना सामान्य नागरिकांचा विचार नाही आणि हा अर्थसंकल्प म्हणजे कॉंग्रेसचा जूना अर्थ संकल्प कॉपी पेस्ट केल्याचं' राहुल गांधी म्हणाले आहेत.
आज मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. यामध्ये आंध्रप्रदेश, बिहार या दोन राज्यांना झालेल्या विशेष घोषणांची सर्वत्र चर्चा असताना राहुल गांधी यांनी X वर आपली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. ' इतर राज्यांच्या जीवावर मित्रपक्षातील राज्यांना पोकळ आश्वासनं, मित्रांना खूष करताना सामान्य नागरिकांचा विचार नाही आणि हा अर्थसंकल्प म्हणजे कॉंग्रेसचा जूना अर्थ संकल्प कॉपी पेस्ट केल्याचं' त्यांनी म्हटलं आहे. Revised Tax Slabs in New Tax Regime: बजेट 2024 मध्ये नव्या कर रचनेमध्ये बदल जाहीर; 3 लाखपर्यंतचं उत्पन्न करमुक्त .
राहुल गांधी यांची पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)