Narendra Modi यांच्या आजारी आई साठी Rahul  Gandhi यांच्या प्रार्थना; शेअर केलं खास ट्वीट

UN Mehta Institute of Cardiology & Research Centre in Ahemdabad मध्ये नरेंद्र मोदींच्या आईवर उपचार सुरू आहेत.

Rahul gandhi and Narendra Modi With Mom| PC: FB and Twitter

Narendra Modi यांच्या 100 वर्षीय मातोश्री हीराबेन मोदी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या भेटीसाठी पंतप्रधान रवाना झाल्याच्या बातम्या आहेत. पण सध्या 'भारत जोडो यात्रा'च्या माध्यमातून प्रेम आणि सद्भावना याने लोकांना जिंकण्याचा प्रयत्न करणार्‍या राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या आजारी आईसाठी देखील प्रार्थना केली आहे. ट्वीट करत त्यांनी माय-लेकाचं प्रेम अनंत आणि अनमोल असतं. तुमच्या आईच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होऊ दे अशी प्रार्थना केली आहे. नक्की वाचा: PM Narendra Modi's Mother Health Update: नरेंद्र मोदींच्या मातोश्री Heeraben Modi यांची प्रकृती स्थिर; UN Mehta Hospital ची माहिती .

राहुल गांधी ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now