Rahul Gandhi On Bypoll Elections Result: "भय आणि संभ्रमाचे जाळे फुटल्याचे स्पष्ट..." पोटनिवडणुकांच्या निकालानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया
तर, केवळ दोन जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे.
सात राज्यातील 13 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत (Bypoll Election Results) इंडिया आघाडीच्या दहा जागा आल्या आहेत. तर, केवळ दोन जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. यावरून काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारवर टीका केली आहे. “सात राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे भाजपाने विणलेले ‘भय आणि संभ्रमाचे’ जाळे फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी, तरुण, मजूर, व्यापारी, नोकरदार अशा प्रत्येक वर्गाला हुकूमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. लोक आता त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी पूर्णपणे इंडिया आघाडीबरोबर उभे आहेत. जय हिंदुस्थान, जय संविधान”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)