Puppeteer Maguni Charan Kuanr Passes Away: पद्मश्री विजेते मगुनी चरण कुंवर यांचं निधन; राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक!
गेल्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रॉड पपेटरीची लुप्त होत असलेली कला जिवंत ठेवल्याबद्दल आणि पारंपारिक रॉड पपेट नृत्याला आयुष्यभर प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
कठपुतली कलाकार मगुनी चरण कुंवर यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ओडिशातील Keonjhar येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षांचे होते आणि अनेक महिन्यांपासून आजारी होते. गेल्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रॉड पपेटरीची लुप्त होत असलेली कला जिवंत ठेवल्याबद्दल आणि पारंपारिक रॉड पपेट नृत्याला आयुष्यभर प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
राष्ट्रपतींचा शोक संदेश
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)