Bhagwant Mann Marriage: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा लग्नाच्या बेडीत, चंदीगड येथे घेणार सात फेरे
मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. सीएम भगवंत मान यांचा विवाह डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत होणार असल्याचे सांगण्यात आले.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी विवाहबद्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. सीएम भगवंत मान यांचा विवाह डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत होणार असल्याचे सांगण्यात आले. हा विवाह सोहळा मुख्यमंत्री मान यांच्या निवासस्थानी एका छोट्या कार्यक्रमात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. भगवंत मान यांचा 6 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)