Petrol, Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेल दरांत 35 पैशांची वाढ
प्रतिदिन हे दर वाढत आसून, ग्राहकांच्या खिशावरील भार वाढतोच आहे. आज (1 नोव्हेंबर 2021) पुन्हा एकदा देशातील इंधन दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेल 35 पैशांनी वाढले. त्यामुळे देशात पेट्रोल डिझेल दरांनी नवा उच्चांक नोंदवला.
पेट्रोल-डिझेल दरवाढ आता सर्वसामान्यांना नित्याचीच बाब होऊन बसली आहे. प्रतिदिन हे दर वाढत आसून, ग्राहकांच्या खिशावरील भार वाढतोच आहे. आज (1 नोव्हेंबर 2021) पुन्हा एकदा देशातील इंधन दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेल 35 पैशांनी वाढले. त्यामुळे देशात पेट्रोल डिझेल दरांनी नवा उच्चांक नोंदवला. नव्या दरांनुसार राजधानी दिल्लीत पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 109.69 रुपये आणि 98.42 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. तर हेच पेट्रोल, डिझेल मुंबई शहरात अनुक्रमे 115.50 रुपये आणि 106.62 प्रतिली लीटर दराने विक्री केले जात आहे.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल, डिझेल दर (प्रतिलीटर)
शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली 109.69 रुपये 98.42 रुपये
मुंबई 115.50 रुपये 106.62 रुपये
कोलकाता 110.15 रुपये 101.56 रुपये
चेन्नई 106.35 रुपये 102.59 रुपये
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)