President's Rule Imposed In Manipur: मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू
सीएम एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर भाजपा कडून मुख्यमंत्रीपदासाठी नवे नाव पक्षाकडून देण्यात न आल्याने अखेर मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
N Biren Singh यांच्या राजीनाम्यानंतर काही दिवसांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्रिपदासाठी नवीन नेत्याचे नाव देऊ शकले नसल्याने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने आज त्याची अधिकृत अधिसूचना जारी करून राज्यात राष्ट्रपती राजवट जाहीर केली आहे. मणिपूर मध्ये हिंसाचाराच्या घटनांनंतर शेकडो लोकं मारली गेली आहेत आणि हजारो बेघर आहेत. अशात काँग्रेसने विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर Biren Singh यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. Missing Meitei Man: मणिपूरमध्ये परिस्थिती चिंताजनक! बेपत्ता पतीसाठी महिलेचे आंदोलन; पतीला जिवंत आणि सुरक्षित आणण्याची लष्कराकडे मागणी .
मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)