Porn Addiction in Gen Z: उच्च न्यायालयाने व्यक्त केली किशोरवयीन मुलांमधील पॉर्न व्यसनाबद्दल चिंता; समुपदेशनाची गरज असल्याचे निरीक्षण

पॉर्नोग्राफी पाहिल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असेही न्यायालयाने म्हटले.

Court | (Photo credit: archived, edited, representative image)

Porn Addiction in Gen Z: चाइल्ड पॉर्नोग्राफीशी (Child Pornography) संबंधित एका प्रकरणात, मद्रास उच्च न्यायालयाने लक्ष वेधले की, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढल्याने किशोरवयीन मुलांमध्ये पॉर्न फोटो आणि व्हिडिओ पाहण्याचे व्यसन विकसित होत आहे. न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश यांनी निरिक्षण नोंदवले की, जनरेशन झेडमधील (Generation Z) मुले अश्लील कंटेंट पाहण्याच्या समस्येशी झुंजत आहेत. मात्र याबाबत समाजाने त्यांना फटकारण्याऐवजी या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी योग्य सल्ला द्यावा, मुलांना शिक्षित करावे. अशा शिक्षणाची सुरुवात शालेय स्तरापासूनच झाली पाहिजे, कारण अडल्ट सामग्री पाहण्याची सुरुवात त्याच टप्प्यावर होते.

पॉर्नोग्राफी पाहिल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असेही न्यायालयाने म्हटले. किशोरवयीन मुलांमधील पॉर्न आकडेवारीबाबत अलीकडील अभ्यासाचीही न्यायालयाने नोंद घेतली. या आकडेवारीनुसार, 10 पैकी 9 मुले वयाच्या 18 वर्षापूर्वी पॉर्नोग्राफीच्या संपर्कात आली होती आणि 10 पैकी 6 मुली वयाच्या 18 वर्षापूर्वी पॉर्नोग्राफीच्या संपर्कात आल्या होत्या. (हेही वाचा: HC on Husband Chromosomes and Child Gender: मुलीला जन्म दिला म्हणून सासरच्यांकडून सुनेचा छळ, हायकोर्ट म्हणाले- 'जन्माला येणाऱ्या बाळाचे लिंग हे पुरुषाच्या गुणसूत्रावर अवलंबून असते')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)