BRICS Summit 2023: PM Modi यांनी ब्रिक्स समिट मध्ये तिरंग्याप्रति दाखवलेल्या सन्मानाच्या या कृतीने South African President Cyril Ramaphosa देखील प्रभावित; सोशल मीडीयातही व्हिडिओ वायरल (Watch Video)
जमिनीवर ठेवलेला तिरंगा पाहून मोदींनी तो लगेच झुकून खिशात ठेवला. त्यांच्या या कृतीचं तातडीने अनुकरण साऊथ आफ्रिकेच्या अध्यक्षांनीही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या BRICS Summit मध्ये सहभागी होण्यासाठी साऊथ आफ्रिकेमध्ये आहेत. यावेळी एका कार्यक्रमात नेत्यांना उभं राहण्यासाठी त्यांचं मार्किंग झेंड्यांवरून दाखवण्यात आलं होतं. जमिनीवर प्रत्येक देशाचे झेंडे होते. मोदी जेव्हा स्टेजवर चढले तेव्हा त्यांनी तिरंगा उचलून खिशात ठेवला. त्यांच्या या कृतीचं अनुकरण त्यांंच्या सोबत असलेल्या South African President Cyril Ramaphosa यांनीही केले. खाली झुकून त्यांनी झेंडा उचलला आणि जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे दिला. सोशल मीडीयात मोदींच्या या कृतीचं कौतुक होत आहे. तसेच हा व्हिडिओ झपाट्याने शेअरही केला जात आहे.
पहा व्हीडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)