पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी अर्थसंकल्पासाठी मागवल्या सूचना
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करणार आहेत.
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम हे देखील उपस्थित असतील. 2026-27 साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री एक फेब्रुवारीला सादर करतील. अमेरिकेने भारतावर लादलेलं ५० टक्के आयात शुल्क तसंच इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)