PM Narendra Modi On Munawwar Rana Death: मुनव्वर राणा जी यांच्या निधनाने दुःख झाले- पंतप्रधान
त्यांनी उर्दू साहित्य आणि कवितांमध्ये भरीव योगदान दिले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवर म्हटले आहे.
प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे रविवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. मुनव्वर राणा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लखनौच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे त्यांची मुलगी सुमैया राणा यांनी सांगितले. त्यांच्या निधनाबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मुनव्वर राणा जी यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांनी उर्दू साहित्य आणि कवितांमध्ये भरीव योगदान दिले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवर म्हटले आहे. (हेही वाचा, Poet Munawwar Rana Dies: ह्रदयविकाराच्या झटक्याने उर्दू कवी मुनव्वर राणा यांच निधन, वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)