PM Narendra Modi लांब पल्ल्याच्या प्रवासातही करत आहेत काम; विमानातील फोटो शेअर करत दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दिवशी नवी दिल्लीहून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले

PM Narendra Modi प्रवासातही करत आहेत काम (Photo Credit : Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दिवशी नवी दिल्लीहून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. पंतप्रधान गुरुवारी दुपारी 2 वाजता वॉशिंग्टनला पोहोचतील. दरम्यान, त्यांनी विमान प्रवासातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये पीएम काही फाईल्ससह दिसत आहेत. पीएम मोदींनी या फोटोसोबत लिहिले आहे, 'लांब पल्ल्याच्या प्रवास म्हणजे कागदपत्र तपासणे आणि काम करण्याची संधी आहे.'

अमेरिकेच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जो बिडेनसह इतर जागतिक नेत्यांशी चर्चा करतील आणि संयुक्त राष्ट्र महासभेला (यूएनजीए) संबोधित करतील. राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी सकाळी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतील. दोन्ही नेत्यांमधील ही पहिली द्विपक्षीय चर्चा असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now