PM Narendra Modi Goes Snorkelling in Lakshadweep: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये घेतला स्नॉर्कलिंगचा आनंद; शेअर केले आपल्या 'उत्साही अनुभवाचे’ फोटो (See Photos)
पीएम मोदी पुढे म्हणाले की, नैसर्गिक सौंदर्यासोबतच लक्षद्वीपची शांतता देखील मंत्रमुग्ध करणारी आहे. या शांत वातावरणाने 140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कष्ट कसे करायचे याचा विचार करण्याची संधी दिली.
PM Narendra Modi Snorkelling in Lakshadweep: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लक्षद्वीपमध्ये स्नॉर्कलिंगचा आनंद लुटला. त्यांनी त्यांच्या दौऱ्याचे फोटोही शेअर केले आहेत. पंतप्रधान मोदींनी साहसप्रेमी लोकांना हे ठिकाण त्यांच्या बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यास सांगितले. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी ट्विटरवर लिहिले की, 'ज्यांना साहस आवडते त्यांच्या यादीत लक्षद्वीप नक्कीच असावे. माझ्या भेटीदरम्यान मला स्नॉर्कलिंगचा आनंद लुटला. किती छान अनुभव होता तो.'
पीएम मोदी पुढे म्हणाले की, नैसर्गिक सौंदर्यासोबतच लक्षद्वीपची शांतता देखील मंत्रमुग्ध करणारी आहे. या शांत वातावरणाने 140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कष्ट कसे करायचे याचा विचार करण्याची संधी दिली. स्नॉर्कलिंग व्यतिरिक्त, पीएम मोदींनी सुंदर बीचवर मॉर्निंग वॉकचे फोटो देखील शेअर केले आहेत. दरम्यान, स्नॉर्कलिंगमध्ये मास्क आणि श्वासोच्छवासाची नळी वापरून पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पोहणे समाविष्ट असते, ज्याला स्नॉर्कल म्हणतात. लोक स्नॉर्केलर्सद्वारे पाण्याखालील अद्भुत दृश्यांचा आनंद घेतात. (हेही वाचा: Traditional Dance Before PM Modi Visit: पंतप्रधान मोदींच्या केरळ भेटीपूर्वी, 2000 महिलांनी त्रिशूरमध्ये तिरुवाथिरा पारंपारिक नृत्य केले सादर, व्हिडिओ पहा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)