Diwali 2022: भारतीय जवानांसोबत 'वंदे मातरम' गात, त्यांना मिठाई भरवत PM Narendra Modi यांनी साजरी केली दिवाळी (Watch Video)
आज नरेंद्र मोदींनी द्रास भागातील लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करांच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची मागील 8 वर्षांपासूनची त्यांची रीत यंदाही कायम ठेवली आहे. आज कारगिलच्या द्रास भागात जवानांसोबत मोदी दिवाळी सेलिब्रेशन मध्ये रमले. आज जवानांनी 'वंदे मातरम' गीत गायलं तर मोदींनीही त्यांच्या सुरात सूर मिळवले. यावेळी त्यांनी जवानांना स्वतः मिठाई देखील भरवली.
जवानांसोबत वंदे मातरम गाताना पंतप्रधान
जवानांना मिठाई भरवताना पंंतप्रधान मोदी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)