PM Modi Telangana Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणात पोहोचले, विरोधकांवर जोरदार टीका
त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबाची भरभराट बघायची आहे. तेलंगणाला अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. असे मोदी म्हणाले
तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय तेलंगणामध्ये 11,355 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी ते आज हैदराबादला पोहोचले होते. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली, ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी काही राजकीय पक्ष सुरक्षेसाठी न्यायालयात गेले होते जेणेकरून कोणीही भ्रष्टाचाराचे पुस्तक उघडू नये, परंतु न्यायालयाने त्यांना परत पाठवले. त्यांना देशाच्या आणि समाजाच्या कल्याणाशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबाची भरभराट बघायची आहे. तेलंगणाला अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. असे मोदी म्हणाले
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)