Platform Ticket Fare: मुंबईमधील महत्वाच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर झाले 50 रुपये; स्टेशन्सवरील गर्दी टाळण्यासाठी Central Railway ची युक्ती

उद्यापासून म्हणजे 22 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत हे दर लागू असतील.

Railway Station ( Photo Credit -Wikimedia Commons)

सध्या देशभरात दिवाळीची धामधूम सुरु आहे. या कालावधीमध्ये अनेक लोक प्रवास करतात. अशात सणासुदीमुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी आणि पनवेल रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची अत्याधिक गर्दी रोखण्यासाठी, मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणजे 22 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत हे दर लागू असतील. गर्दी टाळण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून केवळ वरील स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्यात आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)