Pension System Review By Modi Government: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाने स्थापन केली समिती

वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे. वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. सरकारी कर्मचार्‍यांना लागू असलेल्या नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) च्या विद्यमान रचनेत काही बदल आवश्यक आहेत का, हे समिती सुचवेल. वित्तीय परिणाम आणि एकूण अर्थसंकल्पीय परिणाम लक्षात घेऊन एनपीएस अंतर्गत समाविष्ट असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या पेन्शनरी फायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून समिती सुधारणा सुचवेल.

सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT), विशेष सचिव, खर्च विभाग आणि अध्यक्ष, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) सदस्य असतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अंतर्गत पेन्शनशी संबंधित समस्यांवर लक्ष देईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement