Parrot and Myna Wedding: ऐकावे ते नवलंच! चक्क पोपट आणि मैनेचा लावला विवाह; थाटामाटात पार पडला सोहळा

पोपट आणि मैनेचे लग्न पार पाडण्यासाठी या दोघांच्या कुंडल्याही पाहिल्या गेल्या होत्या.

Parrot and Myna Wedding

मध्य प्रदेशात झालेल्या एका विचित्र लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. इथे चक्क पोपट आणि मैनेचे लग्न लावण्यात आले आहे. पोपट आणि मैनाच्या मालकांनी त्यांचा थाटामाटात विवाह केला आहे. या आगळ्यावेगळ्या लग्नातमोठी मिरवणूक काढण्यात आली. सर्व रितीरिवाजांचे पालन करून पोपट-मैना यांची एकमेकांशी लग्नगाठ बांधण्यात आली. ही बातमी मध्य प्रदेशातील करेलीजवळील पिपिरिया (रकई) नावाच्या गावातील आहे. हे पोपट आणि मैनेचे लग्न पार पाडण्यासाठी या दोघांच्या कुंडल्याही पाहिल्या गेल्या होत्या. कुंडल्या जुळल्यानंतर सर्व रितीरिवाजांचे पालन करून दोघांचे लग्न लावले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)