Pani Puri Ban in Vadodara: वडोदरा मध्ये 10 दिवसांसाठी पाणीपुरी विक्री वर बंदी
वडोदरा मध्ये सध्या उघड्यावर तसेच दुकानातही पाणीपुरी विकायला बंदी घातली आहे.
गुजरातच्या वडोदरा मध्ये 10 दिवस पाणीपुरी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून दुषित पाण्याचा पाणीपुरी तयार करण्यासाठी वापर केला जात आहे. परिणामी काही आजार पसरत असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. पालिका अधिकार्यांनी काही ठिकाणी धाड टाकत पाणीपुरी बनवण्यासाठी वापरत असलेल्या पदार्थांची देखील तपासणी केली आहे. यामध्ये निकृष्ट दर्जाचे पाणी, बटाटे वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील काही दिवस अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं. त्यानंतर पाणीजन्य आजार वाढले आहेत. लायसंस शिवाय पदार्थ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. Chocolate Panipuri Viral Video: 'चॉकलेट पाणीपुरी' कधी खाल्ली आहे का? व्हिडिओ पाहा आणि मगच ठरवा.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)