Pakistan-Made Chili Mili Candy Row: चॉकलेटचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत, तपासनंतर कारवाई, एफडीआयची माहिती
राजस्थानमधील उदयपूरमध्ये गोमांसापासून बनवलेले चॉकलेट विकल्याची घटना समोर आली आहे. शहरातील पोलीस नियंत्रण कक्षापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर बीफ जिलेटिनपासून बनवलेले चॉकलेट कथीतरित्या विकले जात होते. तक्रार मिळताच वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दुकानातील सर्व बीफ टॉफी जप्त केली.
राजस्थानमधील उदयपूरमध्ये गोमांसापासून बनवलेले चॉकलेट विकल्याची घटना समोर आली आहे. शहरातील पोलीस नियंत्रण कक्षापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर बीफ जिलेटिनपासून बनवलेले चॉकलेट कथीतरित्या विकले जात होते. तक्रार मिळताच वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दुकानातील सर्व बीफ टॉफी जप्त केली. ही टॉफी पाकिस्तानातून मागवण्यात आली होती. आता विभागाकडून शहरातील इतर दुकानांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती आहे. वृत्तसंस्था एएनआयने अधिकाऱ्याच्या हवाल्याने याबाबत माहिती असलेले ट्विट केले आहे. चॉकलेटचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement