Pahalgam Terrorist Attack: 'केवळ गुन्हेगारच नाही, तर पडद्यामागील सूत्रधारांनाही सोडणार नाही'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संरक्षण मंत्री Rajnath Singh यांचे पहिले विधान (Video)

या दहशतवादी हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पहिले विधान समोर आले आहे. या दहशतवादी हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

Defence Minister Rajnath Singh

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संताप आहे. दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी सतत होत आहे. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. आता, या दहशतवादी हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पहिले विधान समोर आले आहे. या दहशतवादी हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘पहलगाममधील भ्याड कृत्यात अनेक निष्पाप लोकांनी प्राण गमावले. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. दहशतवादाविरुद्ध भारताचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. मी देशवासियांना खात्री देऊ इच्छितो की सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल. आम्ही केवळ या कृत्याच्या गुन्हेगारांपर्यंतच नाही तर, पडद्यामागील लोकांपर्यंतही पोहोचू. याचे जोरदार आणि स्पष्ट प्रत्युत्तर दिले जाईल.’ (हेही वाचा: 'Surgical Strike 3.0': पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू; संतप्त नेटिझन्सनी पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राइकसह कठोर सूड घेण्याची मागणी)

Pahalgam Terrorist Attack:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement