Mumbai Rain Update: हवामान खात्याकडून 9 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट'; काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची' शक्यता
सकाळी काही काळ पावसानं विश्रांती घेतली होती. काहीशा विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरांत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
मुंबई (Mumbai) आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु होता. सकाळी काही काळ पावसानं विश्रांती घेतली होती. काहीशा विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरांत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने मुंबईच्या हवामान चेतावणीला 9 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे, जे 'काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची' शक्यता दर्शवते. गेल्या 5 दिवसांत शहरात 596 मिमी पाऊस झाला आहे, म्हणजेच जुलैच्या सरासरीच्या 69% पाऊस.
Tweet