Odisha: मासेमारी बोटीतून कॅमेरा आणि मायक्रोचिपसारखे उपकरणे बसवलेले कबूतर जप्त; हेरगिरीसाठी वापरले जात असल्याचा संशय
जगतसिंगपूरचे पोलीस अधीक्षक राहुल पीआर यांनी पीटीआयला सांगितले की, त्यांचे पशुवैद्य पक्ष्याचे परीक्षण करतील. त्याच्या पायांना जोडलेल्या उपकरणांची तपासणी करण्यासाठी राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची मदत घेतली जाणार आहे.
ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप किनार्याजवळ एका मासेमारी बोटीतून कॅमेरे आणि मायक्रोचिप सारखी उपकरणे बसवलेले कबूतर जप्त करण्यात आले, पोलिसांना संशय आहे की हा पक्षी हेरगिरीसाठी वापरला जात होता. काही दिवसांपूर्वी समुद्रात मासेमारी करताना काही मच्छिमारांना त्यांच्या ट्रॉलरवर बसलेले कबुतर दिसले. बुधवारी या पक्ष्याला पकडून सागरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जगतसिंगपूरचे पोलीस अधीक्षक राहुल पीआर यांनी पीटीआयला सांगितले की, त्यांचे पशुवैद्य पक्ष्याचे परीक्षण करतील. त्याच्या पायांना जोडलेल्या उपकरणांची तपासणी करण्यासाठी राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची मदत घेतली जाणार आहे. पक्ष्याच्या पंखांवर स्थानिक पोलिसांना अज्ञात भाषेत काही लिखाण देखील दिसले आहे. हे काय लिहिले आहे ते शोधण्यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेतली जाईल.