हिंदू विवाह कायद्यानुसार लैंगिक संबंध न ठेवणे ही क्रूरता आहे, IPC अंतर्गत नाही - कर्नाटक उच्च न्यायालय

2020 मध्ये एका पत्नीने आपल्या पती आणि सासरच्या लोकांविरूद्ध केलेल्या क्रिमिनल केस फेटाळताना त्यांनी आपलं हे मत मांडलं आहे.

Karnataka High Court | (File Image)

पतीने शारीरिक संबंध नाकारणे हे हिंदू विवाह कायदा-1955 अंतर्गत क्रूरता आहे, परंतु आयपीसीच्या कलम 498A अंतर्गत नाही असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात व्यक्त केले आहे. न्यायालयाने नमूद केले की त्याचा “आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कधीही हेतू नव्हता”, जे “हिंदू विवाह कायद्याच्या कलम 12(1)(अ) अंतर्गत विवाह पूर्ण न केल्यामुळे निःसंशयपणे क्रूरतेचे ठरेल”. परंतु कलम 498A अंतर्गत परिभाषित केल्यानुसार ते क्रूरतेच्या कक्षेत येत नाही, असे त्यात म्हटले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now