Bomb Threat To Home Ministry: दिल्लीत गृह मंत्रालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब धमकीचा इमेल, शोध मोहीम सुरू
मात्र, झडतीनंतर काहीही संशयास्पद आढळले नाही.
दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब धमकीचा इमेल आल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या मेल नंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. दिल्ली अग्निशमन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आम्हाला पीसीआरकडून नॉर्थ ब्लॉकमध्ये बॉम्बचा कॉल आला होता. असे सांगण्यात आले आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास फोन आल्यानंतर शोध मोहिमेत अद्याप काहीही सापडलेले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. नॉर्थ ब्लॉक मध्ये देशाचं गृहमंत्रालय असल्याने हा भाग संवेदनशील आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील शाळा आणि रुग्णालयांनाही बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मात्र, झडतीनंतर काहीही संशयास्पद आढळले नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)