Allahabad High Court: ‘खोट्या आरोपात वैवाहिक नाते आबाधित ठेवण्याची कोणत्याच जोडीदाराची इच्छा नसते’, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे घटस्फोटाच्या याचिकेवर निरीक्षण

पत्नीकडून होणाऱ्या खोट्या आरोपात पीडित पतीने अलाहाबाद हायकोर्टात घटस्फोटाची याचिका केली होती. ज्यात पत्नीने पतीवर हुंडा घेतल्याचा आणि क्रूरता केल्याचा खोटा आरोप केला होता. त्यावर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

Photo Credit- X

Allahabad High Court: घटस्फोटाची मागणी करणाऱ्या एका पतीच्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) सांगितले की, कोणताही जोडीदार, मग तो पुरुष असो वा महिला, दुर्भावनापूर्ण गुन्हेगारी खटल्याच्या धमकीखाली वैवाहिक संबंधात राहू शकत नाही. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, एका पुरुषाने त्याग आणि क्रूरतेच्या कारणावरून (False Criminal Case)आपल्या पत्नीपासून घटस्फोट मागितला. अपीलकर्त्याने न्यायालयाला सांगितले की, त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध खोटा फौजदारी खटला दाखल केला आहे आणि त्याच्यावर क्रूरता आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. मात्र, याचिकाकर्त्याच्या मेहुण्याने कधीही हुंड्याची मागणी केली नसल्याची साक्ष न्यायालयासमोर दिली. अल्पवयीन भावंडांसह तिच्या पतीवर तसेच त्याच्या कुटुंबावर असे आरोप करण्याचा महिलेचा निर्णय अत्यंत क्रूर होता, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले.

याचिकाकर्त्याच्या सासऱ्याने हुंडा मागितला नसल्याची साक्ष दिली

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement