No Aadhar Required For Exchange Of 2000 Notes: पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये 2000 च्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त पुराव्याची गरज नाही - PNB चं स्पष्टीकरण
सध्या पंजाब नॅशनल बॅंकेचा एक जुना फॉर्म वायरल होत आहे ज्यामध्ये माहिती विचारली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आजपासून देशभरात 2000 च्या नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेकांना 'नोटाबंदी' चा वाईट अनुभव आल्यानंतर आता बॅंकेमध्ये 2000 ची नोट लवकरात लवकर बदलून घेण्यासाठी अनेक जण उतावीळ झाले आहेत. पण सध्या पंजाब नॅशनल बॅंकेचा एक जुना फॉर्म वायरल होत आहे ज्यामध्ये माहिती विचारली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र पीएनबीने खुलासा केलेला आहे की अशाप्रकारे नोट बदलून घेण्यासाठी आधार कार्ड किंवा अन्य व्हेरिफाईड डॉक्युमेंट्सची कोणतीही गरज नसेल. Rs 2000 Note Withdrawn: आजपासून बॅंकेमध्ये 2000 च्या नोटा बदलून मिळणार; बॅंकेमध्ये जाण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी!
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)