Nitin Gadkari: देशाच्या लोकसंख्याएवढे वृक्ष लागवड करणार, केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचा नवा निर्धार

आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून देशातील शंभर ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येक ठिकाणी एक हजार याप्रमाणे आजच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात एक लाख वृक्षांचे रोपण केले.

Nitin Gadkari (Photo Credit - PTI)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कायमच त्यांनी केलेल्या निर्धारांसाठी आणि केलेल्या निर्धाराच्या अंमलबजावणीसाठी ओळखल्या जातात. केवळ सत्ताधारी पक्षचं नाही तर विरोधीपक्षासह सर्वसामान्य नागरिकांकडूनही नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक होत. काश्मिर ते कन्याकुमारी पर्यत देशभरात गडकरींनी रस्ते बांधकाम केलं, सर्वस्तरासून त्यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं पण तेवढीचं त्यांच्यावर टिकेची झोडही  उठली कारण रस्ते बांधकामा दरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. त्यामुळे पर्यावरण प्रेमींची  नितीन गडकरींवर विशेष नाराजी होती. संबंधित वृक्षतोडीवरचा उपाय आता नितीन गडकरींना शोधुन काढला असुन ते आता वृक्षारोपमासंबंधी अक्शन मोड दिसुन येणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement