NGO Rescued Stray Dogs: दिल्ली येथे एनजीओने पूरग्रस्त भागातील भटक्या कुत्र्यांची सुटका केली (Watch Video)

राजधानी दिल्लीमध्ये आज मुसळधार पूर स्थिती पाहायला मिळाली. आज सकाळी 8 वाजता यमुनेची पाणी पातळी 208.48 मीटरवर पोहोचली, असे केंद्रीय जल आयोगाने सांगितले. MCD नुसार, दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स झोनमधील सखल भागातील 10 शाळा, शहाद्रामधील 7 शाळा आज पूरसदृश परिस्थितीमुळे बंद ठेवण्यात आल्या.

राजधानी दिल्लीमध्ये आज मुसळधार पूर स्थिती पाहायला मिळाली. आज सकाळी 8 वाजता यमुनेची पाणी पातळी 208.48 मीटरवर पोहोचली, असे केंद्रीय जल आयोगाने सांगितले. MCD नुसार, दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स झोनमधील सखल भागातील 10 शाळा, शहाद्रामधील 7 शाळा आज पूरसदृश परिस्थितीमुळे बंद ठेवण्यात आल्या. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना प्रशासन आणि एनजीओंनी मदत केली. दरम्यान, दिल्ली येथे एनजीओने पूरग्रस्त भागातील भटक्या कुत्र्यांची सुटका केली. वृत्तसंस्था एएनआयने या प्रसंगाचा व्हिडिओ ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. लाल किल्ला आणि चांदगी राम आखाडा परिसरातील हे दृश्य आहे.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement