Uttar Pradesh Shocker: मधुचंद्राच्या रात्री काळाचा घाला, नवविवाहीत जोडप्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, उत्तर प्रदेशातील बहराईच येथील घटना

जिल्ह्याचे एसपी प्रशांत वर्मा यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवालात पती-पत्नी दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dead| Photo Credit - Pixabay

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात नवविवाहित जोडपे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृतावस्थेत आढळले. शवविच्छेदन अहवालात वधू आणि वराचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले. 22 वर्षीय प्रताप यादवने 30 मे रोजी 20 वर्षीय पुष्पासोबत लग्न केले. लग्नानंतर दोघेही पती-पत्नी त्यांच्या खोलीत गेले पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. जिल्ह्याचे एसपी प्रशांत वर्मा यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवालात पती-पत्नी दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाहा पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now