New President of India: द्रौपदी मुर्मू झाल्या भारताच्या नव्या राष्ट्रपती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन (Watch Video)

मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मुर्मू यांनी आघाडी घेतली होती.

PM Narendra Modi and Droupadi Murmu (Photo Credit : ANI)

2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मोठा विजय मिळवला आहे. द्रौपदी मुर्मू भारताच्या 15 व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा सामना विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याशी झाला होता. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मुर्मू यांनी आघाडी घेतली होती. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राज्य युनिट्सने विजयानंतर जल्लोषाची तयारी केली आहे. ही निवडणूक जिंकून मुर्मू या आदिवासी समाजातील देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)