New Parliament Building Inauguration Live Streaming: नव्या संसद इमारतीच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला सुरूवात; इथे पहा थेट प्रक्षेपण
नवीन सभागृह जुन्या सभागृहाच्या तिप्पट मोठी आहे.
दिल्ली मध्ये नव्या संसद इमारतीच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झाली आहे. सकाळी सेंगोल अर्थात राजदंडाची पूजा करण्यात आल्यानंतर त्याची स्थापना लोकसभा अध्यक्षांच्या जवळ करण्यात आली आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त फलकाचे अनावरण केले. आता सर्व धर्मीय प्रार्थना आणि मंत्रोच्चार करून या इमारतीचा उद्घाटन सोहळा सुरू करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपा खासदार, मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. विरोधी पक्षांच्या खासदारांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)