Nepal Helicopter Crash: नेपाळच्या नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती

एसपी शांतीराज कोईराला यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. स्थानिक वृत्तानुसार, नुवाकोट जिल्ह्यातील शिवपुरी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात किमान चार जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. हेलिकॉप्टरने काठमांडूहून उड्डाण घेतले होते आणि अपघाताच्या वेळी ते स्याफ्रुबेन्सी येथे जात होते.

Helicopter (PC - ANI)

Nepal Helicopter Crash: नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यात एअर डायनेस्टी हेलिकॉप्टर कोसळले आहे. एसपी शांतीराज कोईराला यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. स्थानिक वृत्तानुसार, नुवाकोट जिल्ह्यातील शिवपुरी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात किमान चार जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. हेलिकॉप्टरने काठमांडूहून उड्डाण घेतले होते आणि अपघाताच्या वेळी ते स्याफ्रुबेन्सी येथे जात होते. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये पाच जण होते. यामध्ये तीन प्रवासी, एक परदेशी नागरिक आणि एक पायलट यांचा समावेश होता. हे देखील वाचा: Delhi Coaching Centre Deaths: दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेचा तपास सीबीआय करणार; पोलिसांडून सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपूर्द

पाहा पोस्ट:

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)