Student Suicide: राजस्थानच्या सीकरमध्ये NEET विद्यार्थ्याची आत्महत्या, तीन दिवसांत दुसरा मृत्यू

सीकरमध्ये तीन दिवसांत विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. 5 ऑक्टोंबर रोजी, 16 वर्षीय NEET परीक्षार्थी कौशल मीना याने वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका खाजगी वसतिगृहात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. भरतपूर जिल्ह्यातील नादबाई शहरातील रहिवासी असलेले नितीन फौजदार जूनमध्ये NEET च्या तयारीसाठी सीकर येथे आले होते. तो एका कोचिंग सेंटरमध्ये तयारी करत होता आणि शनिवारी त्याचा वर्ग वगळला, असे उद्योग नगर पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर, सुरेंद्र डेग्रा यांनी सांगितले.

सीकरमध्ये तीन दिवसांत विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. 5 ऑक्टोंबर रोजी, 16 वर्षीय NEET परीक्षार्थी कौशल मीना याने वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now