National Unity Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली 'राष्ट्रीय एकता दिन' निमित्त शपथ (Watch Video)

गुजरातच्या एकता नगर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना राष्ट्रीय एकता दिवस ची शपथ दिली आहे.

PM MODI | Twitter

भारताचे पहिले गृहमंत्री आणि स्वातंत्र्यानंतर देशातील अखंडता अबाधित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 148 जयंती आहे. त्यांचा जन्मदिवस आता 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची शपथ नागरिकांना दिली. स्टॅच्यू ऑफ युनिटीवर जाऊन त्यांनी पटेल यांना आदरांजलीही अर्पण केली आहे.  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी मेरा युवा भारत संघटनेचा शुभारंभ करतील. पंतप्रधानांच्या हस्ते आज केवाडियामध्ये विविध प्रकल्प आणि योजनांचा शुभारंभ आणि भूमीपूजन पार पडणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement