Price Cut In Essential Medicines: 70 अत्यावश्यकऔषधांच्या किंमती होणार कमी; NPPA च्या बैठकीत निर्णय
NPPA हे देशातील औषध नियामक आहेत. देशात औषधांची उपलब्धता, किमती नियंत्रित करणे आणि औषधांमधील भेसळ थांबवणे यासाठी ते काम करत असतात. एनपीपीए ची स्थापना भारत सरकारने 1997 मध्ये रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत केली आहे.
National Pharmaceutical Pricing Authority कडून 70 अत्यावश्यक औषधं आणि 4 विशेष औषधांच्या किंमतींमध्ये कपात करण्याचा निर्णय झाला आहे. ही औषधं प्रामुख्याने लाईफस्टाईलशी निगडीत आजारांची आहे.ज्यात पेन किलर, ताप, संसर्ग, डायरिया, मसल्स पेन, अॅन्टिबायोटिक्स, मधूमेह, रक्तदाब आणि हृद्याशी निगडीत आजारांचा संबंध आहे. यासोबत विशेष औषधांमध्ये काही अॅन्टीबायोटिक्स, मल्टिव्हिटॅमिन्स, कॅनसर, मधूमेह आणि हार्ट शी निगडित औषधांचादेखील समावेश आहे. जून 2024 च्या सुरूवातीला सरकारने 54 फॉर्म्युलेशन आणि 8 आवश्यक औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)