Mysuru Road Accident: म्हैसूरजवळील भीषण अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू; समोर आला धक्कादायक व्हिडीओ (Watch)

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी म्हैसूर जिल्ह्यातील टी नरसीपुराजवळ झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

Accident (PC- File Photo)

आज कर्नाटकातील म्हैसूरजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातामध्ये दोन लहान मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तिरुमाकुडलू-नरसीपूरजवळ खासगी बस आणि कार यांच्यात धडक होऊन हा अपघात घडला. यामध्ये अनेक लोक जखमीही झाले आहेत. आता या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. वळणावर कारची आणि बसची भयानक धडक झाल्याचे व्हिडीओ दिसत आहे. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा चक्काचूर झाला. मोठ्या कष्टानंतर मृतदेह कारमधून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, आजूबाजूच्या लोकांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी म्हैसूर जिल्ह्यातील टी नरसीपुराजवळ झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. (हेही वाचा: Odisha Shocker: मुलगी झाली म्हणून वडिलांनी 20 दिवसांच्या मुलीला दिले विषाचे इंजेक्शन, पोलिसांकडून अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now