Muslim Women Can Enter Masjid: 'नमाज अदा करण्यासाठी महिलांना मशिदीत प्रवेश करण्याची परवानगी आहे'; All India Muslim Personal Law Board ची सर्वोच्च न्यायालयात माहिती

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दुसऱ्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, मुस्लिम महिलांना नमाज अदा करण्यासाठी मशिदींमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे.

Supreme Court (Photo Credit - Twitter)

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी- AIMPLB) बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, महिलांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी आहे. बोर्डाने म्हटले आहे की, मुस्लिम महिला नमाजासाठी मशिदीत प्रवेश करू शकतात आणि आणि मशिदीमध्ये नमाजासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घेण्याचा अधिकार वापरण्याच्या पर्यायाचा त्या विचार करू शकतात. एआयएमपीएलबीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हे सांगितले आहे, ज्यामध्ये मुस्लिम महिलांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीत प्रवेश करण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी पार पडली.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दुसऱ्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, मुस्लिम महिलांना नमाज अदा करण्यासाठी मशिदींमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे. बोर्डाने इस्लामिक धर्मग्रंथांचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, मुस्लिम महिलांना मशिदींमध्ये प्रवेश करण्यास आणि एकट्याने किंवा सामुहिकरित्या नमाज अदा करण्यास कोणतेही बंधन नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)