Mumbai: मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, चिकनगुनिया, कावीळचे रुग्ण वाढले; जाणून घ्या ऑक्टोबरमधील रुग्णसंख्या
मुंबईमध्ये लेप्टोमुळे एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, चिकनगुनिया, कावीळचे रुग्ण वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यांत मलेरियाचे ४८२, डेंग्यूचे २१३, गॅस्ट्रोचे १९३, लेप्टोचे २९, चिकनगुनियाचे ३०, कावीळचे ३० आणि स्वाईन फ्लूचे ६१ रुग्ण आढळले. यावर्षी लेप्टोमुळे एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.