Mumbai Airport: मुंबई विमानतळारुन तब्बल 4.1 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त
मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाने (Mumbai Airport Customs) गुरुवारी 4,97,000 डॉलर किमतीचे विदेशी चलन जप्त केले. ज्याची किंमत भारतीय रुपयानुसार सुमारे 4.1 कोटी रुपये आहे. मुंबई एअर इन्व्हेस्टिगेशन युनिटने केलेल्या लक्ष्यित ऑपरेशनमध्ये, Fly Dubai flight FZ 446 द्वारे दुबईला निघालेल्या तीन भारतीय प्रवाशांच्या कुटुंबाला रोखण्यात आले.
मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाने (Mumbai Airport Customs) गुरुवारी 4,97,000 डॉलर किमतीचे विदेशी चलन जप्त केले. ज्याची किंमत भारतीय रुपयानुसार सुमारे 4.1 कोटी रुपये आहे. मुंबई एअर इन्व्हेस्टिगेशन युनिटने केलेल्या लक्ष्यित ऑपरेशनमध्ये, Fly Dubai flight FZ 446 द्वारे दुबईला निघालेल्या तीन भारतीय प्रवाशांच्या कुटुंबाला रोखण्यात आले. कुटुंबात दोन वृद्ध प्रवासी आणि अन्य एक पुरुष प्रवासी होता. या कुटुंबाकडे कस्टमने केलेल्या तपासात त्यांच्याकडून विदेशी चलन जप्त करण्यात आले.
ट्विट
Mumbai Airport Customs yesterday seized foreign currency worth USD 4,97,000, equivalent to about Rs 4.1 crores, from three Indian passengers who were travelling to Dubai. All three have been arrested and sent to judicial custody: Customs pic.twitter.com/Cr778gdFVC
— ANI (@ANI) November 3, 2022
मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाकडून तीनही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तिघांकडून एकूण 4,97,000 USD डॉलर इतक्या रकमेचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2022 12:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

