MSRTC Bus Accident Indore: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली इंदोर बस अपघाताची दखल
बचावकार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत अशी माहिती राज्याचे उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
इंदूरहून (Indore) जळगावच्या दिशेने जाणारी बस नर्मदा नदीत (Narmada River) कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू तर 15 जण बेपत्ता आहेत. ही घटना मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील धार (Dhar) येथे घडली. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) आणि एसटी महामंडळाचे (ST Mahamandal) अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत अशी माहिती राज्याचे उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी खुद्द धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी बातचीत केली आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात असुन जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना उपमुखयमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)