Morgan Stanley Investment In Paytm: मॉर्गन स्टॅनलीची पेटीएममध्ये मोठी गुंतवणूक; खरेदी केले 244 कोटी रुपयांचे शेअर्स

मॉर्गन स्टॅनले एशिया सिंगापूर पीटीई (ODI) ने कंपनीचे 50,00,000 शेअर्स प्रत्येकी 487.2 रुपये दराने विकत घेतले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर हा व्यवहार पार पडला.

Morgan Stanley (Photo Credit- Wikimedia Commons)

Morgan Stanley Investment In Paytm: मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी खुल्या बाजारातून पेटीएम पॅरेंट वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडमधील (Paytm One97 Communications Ltd) किरकोळ 0.8% भागभांडवल सुमारे 244 कोटी रुपयांना विकत घेतले. मॉर्गन स्टॅनले एशिया सिंगापूर पीटीई (ODI) ने कंपनीचे 50,00,000 शेअर्स प्रत्येकी 487.2 रुपये दराने विकत घेतले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर हा व्यवहार पार पडला. नुकतेच आरबीआयने Paytm Payments Bank Ltd (PPBL) ला 29 फेब्रुवारी नंतर कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांमध्ये, वॉलेट, FASTags आणि इतर साधनांमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स शुक्रवारी आणखी 20 टक्क्यांनी घसरले. वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडची पेटीएम पेमेंट्स बँकेत 49 टक्के भागीदारी आहे, परंतु ती कंपनीची सहयोगी म्हणून वर्गीकृत करते आणि उपकंपनी म्हणून नाही. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या सेवा 29 फेब्रुवारीच्या पुढे चालू राहतील. आरबीयेयचे निर्देश पेटीएम पेमेंट्स बँकेवर आहेत, पेटीएम वर नाहीत. (हेही वाचा: Action Against Paytm Payments Bank Ltd: पेटीएम पेमेंट्स बँकविरुद्ध RBI ची मोठी कारवाई; नवीन ग्राहक जोडण्यास बंदी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement