Monsoon Session of Parliament 2023: संसदेचं पावसाळी अधिवेशन यंदा 20 जुलैपासून
20 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यानच्या अधिवेशनामध्ये एकूण 17 बैठका होणार आहेत. अशी माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झाल्यानंतर आता पावसाळी अधिवेशन 20 जुलै पासून सुरू होणार आहे. 11 ऑगस्ट पर्यंत संसदेचं कामकाज चालणार आहे. आज संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. हे अधिवेशन वादळी ठरेल अशी अपेक्षा आहे कारण संसदेची बैठक होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी संहितेसाठी जोरदार भूमिका मांडली आणि या विषयावर चर्चेची शक्यता आहे. 23 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 17 बैठका होणार आहेत. जोशींनी सर्व पक्षांना अधिवेशन काळात विधीमंडळ आणि संसदेच्या इतर कामकाजात रचनात्मक योगदान देण्याचे आवाहन केले आहे. PM Narendra Modi यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं प्रतिक म्हणून जारी केलं 75 रुपयाचं विशेष नाणं (Watch Video) .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)