Maharashtra Rains Update: ठाणे, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता

आयएमडी (IMD) ने आज दिलेल्या इशा-या नुसार, पुढच्या 3-4 दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे

Rain | Representational Image | (Photo Credits: PTI)

आयएमडी (IMD) ने आज दिलेल्या इशा-या नुसार, पुढच्या 3-4 दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा सर्वाधिक प्रभाव मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात राहणार आहे. आता के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे की, नागपूरच्या रडारवर ढग भरून आले आहेत. विदर्भ सोबतच लगतच्या मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु आहे.

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथे पुढील 3-4 तासांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि सातारा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील 3-4 तासात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबादमध्ये मेघगर्जनेसह/विजेच्या गडगडाटासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)